गावाचा इतिहास 📜 “भूतकाळाच्या पाऊलखुणांतून उज्वल भविष्याकडे”
खिद्रापूर गावंची माहिती
मौजे खिद्रापूर गावं हे कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्व टोकास महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कृष्णामाईच्या कुशीत वसलेले एक सुंदर खेडे गावं असून पर्यटन स्थळ आहे.पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात देशी विदेशी पर्यटक रोज भेट देतात .शिल्पकलेने नटलेले व महाराष्ट्र खजुराहो म्हणून ओळखले जाणारे खिद्रापूर, जिल्हा कोल्हापूर येथील श्री.कोपेश्वर मंदिर व श्री.१००८ आदिनाथ दिगंबर जेन मंदिर खिद्रापूर तसेच श्री.क्षेत्र शेखनिजामुद्दीन राजे बक्सार पीर दर्गा आहे व श्री.क्षेत्र बिरदेव मंदिर अशा चार प्रकारचे देवस्ताने आहेत.या सर्व प्रकारच्या मंदिर मध्ये वेगवेगळे भोगोलिक इतिहास आहे.
श्री.क्षेत्र कोपेश्वर मंदिर अतिप्राचीन व सुंदर शिल्पकला कुसारीने नटलेले हे मंदिर आहे.सदर मंदिराची मोठी यात्रा पौष वध आमावश्या दिवशी तीन दिवस मोठी यात्रा भरते.त्या यात्रे दिवशी सदर मंदिराला स्थानिक महत्व असून सदर मंदिरा पासुन दोन किलोमीटरच्या अंतरावर दक्षीणेस शुक्ल तिर्थस्थान आहे.कृष्णानदीवर शुल्क तीर्थक्षेत्र असून येथे स्नान करणेसाठी कर्नाटक,महाराष्ट्र,आंर्ध,केरळ मधील अनेक भाविक तीर्थस्नान करुन श्री. कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेतात.त्या दिवशी कर्नाटकमधून सात ठिकाणाहून पालखी मिरवणूक व भविक मोठ्या प्रमाणात येतात व दर्शन घेवुन खिद्रापूर,राजापूरवाडी मार्गे चंदूर श्री.क्षेत्र यडूर येथे पालखीसह जातात तसेच महाशिवरात्री दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. श्री दत्त जयंती दिवशी श्री.नरसोवाडीचे दर्शन घेवून पर्यटक व भावीक मोठ्या प्रमाणात श्री.कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेतात व श्रावण महीण्यात प्रत्येक सोमवारी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.
श्री.जेनं १००८ आदिनाथ मंदिर आहे.तीर्थकराची हजारो वर्षापुर्वीची असून ती उत्थख़नात सापडली आहे .सदर मंदिरात दर आमावाशाला श्री.१००८ अधिनाथ भगवान तिर्थकरांचे महामस्तकाभिषेक सोळाह साजरा होतो.सदर मंदिर पाहण्यासाठी व भगवंताचे दर्शन घेणेसाठी पर्यटक व भविक मोठ्या प्रमाणात भेट देतात
श्री. क्षेत्र शेखनिजामुद्दीन राजे बक्सार पीर दर्गा आसुन सदर दर्गा पुरातन आहे.या ठिकाणी मुस्लिमांचे संत दिलीचे शाही शेखनिजामुद्दीन राजे बक्सार पीर दर्गा यांचे येथे आसन स्थान आहे. यांचे दर्शन घेणेसाठी भविक मोठ्या प्रमाणात भेट देतात.याचे दर वर्षाला उरूस साजरे केले जाते.
तसेच काही अंतरावर श्री.क्षेत्र बिरदेव मंदिर आहे.सदर मंदिराची दसरा या दिवशी सोने लुटन्याचा कार्यक्रम पारंमपरीक पध्दतीने साजरा केला होतो.
पिके :
खिद्रापूरमध्ये नदी असल्याकारणाने येथे केळी ,ऊस,सोयाबीन,गहू.अशा अनेक प्रकारची पिके घेतली जातात.येथे काळीरेगुर व नदीकाठी गाळाची अशा दोन प्रकारची मृदा आढळते.मोठ्या प्रमाणात येथील शेत जमीन हि नदीबूड जमीन आहे.केळी व उस उत्पादनात खिद्रापूर गावाचे मोठे योगदान आहे.
खिद्रापूर गावं हे महाराष्ट्र व कर्नाटक सीमेजवळचे एक सुंदर खेडे गाव आहे यां गावां नंतर कोणत्याही प्रकारचा महाराष्ट्राचा भूभाग नाही
नदी :
कृष्णा नदी ही खिद्रापूर गावाला लाभलेली एक जीवनदायिनी आहे. या नदीला बारमाही पाणी असते.पावसाळ्यात सदरची नदी दुथडी भरून वाहते व दरवर्षी या नदीला पूर येतो. १९१४ ,१९६१,१९९४,या सालामध्ये या नदीला मोठ्या स्वरूपात महापूर आलेला होता पंरतू २००५-०६ २०१९ ,२०२०, २०२१ साली आलेल्या महापूरामूळे खिद्रापूर व पंचक्रोषित मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली.या खिद्रापूर परिसरातील शेतकऱ्याची जनावरे वाहून गेली,पिके सुद्धा वाहून गेली.यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले.
सेवासुविधा :
खिद्रापूरमध्ये ग्रामपंचायत मार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.५५० खाजगी नळ कनेक्शन आहेत.कर्णाटक मध्ये नदी वाटे जाण्यासाठी नावची सुविधा आहे.दर शनिवारी खिद्रापूर गावंचा बाजार भरवला जातो.
मनोरंज कार्यक्रम :
श्री.कोपेश्वर मंदिऱ्याच्या यात्रेदिवशी व श्री.क्षेत्र शेखनिजामुद्दीन राजे बक्सार पीर दर्गा व श्री.क्षेत्र बिरदेव मंदिऱ्याच्या यात्रे व उरुस दिवशी मनोरंज कार्यक्रम घेतले जाते.यात्रे दिवशी नावाच्या शर्ती घोडागाडी शर्ती, सायकल शर्ती,कबाडी स्पर्धा,कलाथक अशा अनेक प्रकारची मनोरंनात्यक कार्यक्रम घेतले जतात.